Social media is an addiction / सोशल मीडिया एक व्यसन

Read English Translation…

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडिया आज-काल सगळ्यांना परिचित अशी संज्ञा आहे. सोशल मीडियावर ज्यांच्या अकाउंट नाही तो अशिक्षित आहे असा आज आपण म्हणू शकतो. खूप मोठा समाजातील गट हा सोशल मीडियाचा वापर करतो आहे आणि काही समाजातील गट अजूनही सोशल मीडियापासून अजूनही दूरच आहे.

सोशल मीडियाचा वापर अवास्तव होत असेल तर कदाचित त्याचे दुष्परिणाम आपल्या किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील. सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही आहे की, सोशल मीडियावर अवास्तव चालणारे मेसेजेस ज्याचा वास्तविकतेची कुठलाही संबंध नाही यावर आपण आपल्या क्रिया-प्रक्रिया व त्यात वापरली जाणारी भाषा आणि त्यामधून उत्पन्न होणाऱ्या समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मत व व्यक्त होणाऱ्या भावना ह्या इतरत्र लोकांना मानसिक त्रास देणाऱ्या सुद्धा ठरू शकतात. अशा प्रकारचे मत मतांतर सोशल मीडियावर होत असेल तर युवा पिढी ला ह्या पासून स्वतःला दूर करावं लागेल. सोशल मीडिया हे तुमच्या मनात काय सुरू आहे तुम्हाला लोकांना काय सांगायचे आहे अशी माहिती आदान प्रदान करण्यासाठी वापरण्यात येणारा हा मीडिया परंतु यावर जर आपण अवास्तव काही वातावरण किंवा भयाचे वातावरण बनवत असलो तर याचा दुष्परिणाम आपल्याला आपल्या मानसिक त्रासाने भोगावे लागेल. आणि सोशल मीडिया हा एक मानसिक व्यसन बनून राहील. 

सोशल मीडियाचा वापर विद्यार्थी दशेत असताना आपण आपला अभ्यासू वृत्ती वाढवण्यासाठी सुद्धा करू शकतो किंवा आजचा वेळेत या कोरोना काळात एकमेकांना माहिती त्यांचे अभ्यासू विचार आदण प्रदान करण्याकरिता सुद्धा करू शकतो परंतु त्याचा तसा वापर खूप कमी प्रमाणात दिसून येत आहे याउलट त्याचे दुष्परिणाम जास्त दिसतात. किंवा एखाद्याची कुठलीही पोस्ट असेल तर त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अवास्तव संभाषण त्यावर येत आहे. परंतु सोशल मीडियाचा वापर करून आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो शिक्षण क्षेत्र हे भरपूर मोठे असून प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची माहिती असतेच असा नाही, आजच्या कोरोना काळामध्ये जरी आपला वास्तविक वर्ग वास्तविक गट एकत्र येऊ शकत नाही तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत संभाषण करू शकतो किंवा आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो. आपला सिल्याबस , परीक्षांतीन प्रश्नाचे संच, विदवत्त विध्यर्थ्याचे विचार, आपण भेट दिलेल्या स्थानाचे फोटो, त्यावरील संभाषण, क्रीडा जगातील माहिती, सामान्य ध्यान, योग साधना, आभासी वर्ग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर आपल्या योग्यतेसाठी कसा करावा या करीता काही मार्गदर्शन, नोकरी विषयक मार्गदर्शन या साठी सुद्धा आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतो.

सोशल मीडियाचा वेळ सीमित असावा ?
अनेक लोकांचा मनात हा प्रश्न भेडसावत असेल कि, जर सोशल मीडिया चा वापर केला किंवा नाही केला तरी काय फरक पडेल. त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न आहे कि, तुम्ही सोशल मीडिया चा एक दोन दिवस वापर टाळू शकता का? जर तुम्ही असे करू शकत असाल तर नक्की तुमचा तुमच्या मनावर ताबा आहे किंबहुना तुम्ही तुमचा कामामध्ये पारंगत असू शकाल, परंतु असे किती लोक करू शकतात, सोशल मीडिया चा वापर नक्की करा परंतु त्याचा वापर सीमित असावा आणि त्यावर संवेदनशील माहितीचा प्रचार आणि प्रसार करणे टाळावा. इतकेच नव्हे तर त्यात आपले छायाचित्र टाकताना सुद्दा विचार करावा. तर याचा विचार नक्की करा कि किती वेळ तुम्ही सोशल मीडिया मध्ये देता आणि द्यायला हवा. 

शाळा आणि महाविद्यालये फेसबुक आणि युट्युब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जोडतात ?
सोशल मीडिया मध्ये नावाजलेले नाव म्हणजे फेसबुक आणि युट्यब आणि आता इंस्टाग्राम. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण देण्याची पद्दत आता बदलत आहे, मुलांना शिक्षण देण्यासाठी या कोरोना काळात सर्रास सोशल मीडिया चा वापर करत आहे. परंतु त्या सोशल मीडिया चे उद्देश शिक्षण देणे नाही किंवा ते त्यासाठी बनवलेले सुद्धा नाही. केवळ त्यामध्ये विध्यार्थी वर्ग इतका गुंतला आहे कि, आज शाळा आणि महाविद्यालयांना आपल्या विद्यार्थ्यांसोबत कसे संभाषण साधावे याचा मार्ग राहिला नाही म्हणून अशी परिस्थिती ओढवली असावी. याबाबत शाळा , महाविद्यालये आणि पालक वर्ग यांनी विचार करायला हवा कि आपला पाल्य कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात आवड निर्माण करेल. कारण आता या कोरोना काळात शिक्षण आणि ध्यान वाटणे हे खरंच एक आव्हानात्मक कार्य असेल.

सोशल मीडिया वरील माहिती व बातमी ची सत्यता ?
सोहळा मीडिया मध्ये येणाऱ्या बातम्या किंवा माहिती हि वेगवेगळ्या लोकांनी शक्यतोवर आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या जाहिरातीसाठी टाकलेले असतात फारच कमी माहिती हि निशुल्क आणि सत्य असू शकते. परंतु आपण सोशल मीडिया चा वापर करत असताना त्याची सत्यता जाऊन घेऊनच ती सामायिक करायला हवी. सत्यता तपासण्याकरिता तुह्मी टीव्ही किंवा वर्तमानपत्रे यांचा इलेट्रॉनिक किंवा डिजिटल ऍड्रेस चा वापर करू शकता. आश्वस्त असल्यास ती माहिती व बातमी सामायिक करावी. 

— निलेश भोयर


English Translation….

Dear friends,
We all know that social media is a familiar term these days. Today we can say that those who do not have an account on social media are uneducated. A very large community group is using social media and some community groups are still far from social media.

If the use of social media is unrealistic, it may have a detrimental effect on you or your future generations. One of the biggest concerns is that unrealistic messages on social media that have nothing to do with reality can be a source of emotional distress to people elsewhere, including our actions and the language used and the opinions and feelings expressed by different sections of society. If such an opinion is being circulated on social media, the younger generation will have to distance themselves from it. Or social media is a medium used to exchange information about what is going on in your mind and what you want to tell people, but if you create an atmosphere of unrealism or fear on it, you will have to bear the brunt of it. And social media will continue to be a mental addiction. 

We can use social media to enhance our studious attitude when we are students or to share information with each other in today's corona era, but its use is rarely seen and its side effects are more. Or if someone has any post, there is a lot of unrealistic conversation coming up on it. But using social media we can bring about a radical change in our field of education. The field of education is huge and not everyone knows everything. Or we can exchange our thoughts. Your syllabus, a set of exam questions, scholarly thoughts, photos of the place you visited, conversations about it, information on the sports world, general meditation, yoga practice, virtual classes, some tips on how to use artificial intelligence to your advantage, job guidance We can also use social media for.

Should social media time be limited?
Many people may be wondering, what is the difference between using social media or not. One of my questions for them is, can you avoid using social media for a day or two? If you can do that then you have control over your mind or you may be good at your job, but no matter how many people can do it, use social media for sure but its use should be limited and avoid spreading and disseminating sensitive information on it. Not only this, with the help of this photo you can do wonders. So think about how much time you spend on social media.

Do schools and colleges connect students through Facebook and YouTube?
Famous names in social media are Facebook and YouTube and now Instagram. The method of teaching in schools and colleges is now changing, with the widespread use of social media in this Corona era to educate children. But that social media is not intended to educate or make it. It is only because the students are so involved in it that today schools and colleges have no way of communicating with their students. In this regard, schools, colleges and parents should think about how their child will develop interest in education. Because now in this Corona era learning and teaching will be a really challenging task.

The veracity of information and news on social media?
The news or information that comes in the ceremony media is thrown by different people for your benefit or your advertisement. Very little information can be free and true. But when you use social media, you have to share its authenticity. You can use the electronic or digital address of the TV or newspaper to check the authenticity. If confident, share that information and news.

— Nilesh Bhoyar